Wednesday, June 18, 2025 02:33:40 PM

रवी वर्माच्या चौकशीत धक्कादायक खुलासे उघड

रवी वर्मा नामक अभियंत्याला पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसकडून वर्माची चौकशी सुरु आहे.

रवी वर्माच्या चौकशीत धक्कादायक खुलासे उघड

ठाणे : रवी वर्मा नामक अभियंत्याला पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसकडून वर्माची चौकशी सुरु आहे. चौकशीत त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली रवी वर्मा या 27 वर्षीय अभियंत्याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. समाज माध्यमावर तरुणीच्या प्रोफाईलद्वारे या  तरुणाला पाकिस्तानी गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा बेलापूरमध्ये एका खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता होता. ही कंपनी मुंबई नौदल गोदीला सेवा पुरवते. आरोपी गोदीत कामानिमित्त जात असे. त्याच्याकडे गोदीचे नकाशे व छायाचित्रे होती. समाज माध्यमावरून संपर्कात आलेल्या तरूणीला तो ही माहिती पुरवत होता. हा हनी ट्रॅप प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वर्मा याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार तो नोव्हेंबर 2024 पासून कथित तरुणीच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. वर्माबरोबरच आणखी एका व्यक्तीचीही माहिती मिळाली असून तोही पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.

सध्या वर्मा पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रवी वर्माने 14 पाणबुड्या, युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. त्याने युद्धनौका, इतर जहाजाची माहिती आणि चित्रही बनवून पाठवले आहेत. रवी पाकमधील 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुक अकाउंटची नावं आहेत. रवी वर्माने नेव्हल डॉकमधल्या युद्धनौकांची माहिती या फेसबुक अकाऊंट धारकांना पाठवली आहे. 

हेही वाचा : ढेकळांचे पंचनामे...?; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य समोर

रवी वर्माची देशाशी गद्दारी? 
रवी वर्मा 2024 पासून दोन पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात आहे. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशा 2 पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात असून वर्मानं 14 पाणबुड्या,युद्धनौकांची माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे. युद्धनौका, इतर जहाजांची माहिती तसंच चित्र पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ऑडिओ आणि टेक्स्ट तसेच चित्र स्वरुपात माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे. 

'हनीट्रॅप'ची भूल देशाची दिशाभूल 

12 मार्च 2024 - माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकरला अटक

12 डिसेंबर 2023 - नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला अटक

ऑक्टोबर 2020 - नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाठला अटक

4 मे 2023 - डीआरडीओचे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांना अटक 


सम्बन्धित सामग्री