सिंधुदुर्ग : लोकशाहीच्या उत्सवाची पुढील पायरी आज पार पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी दि. 09 फेब्रुवारी रोजी जाहीर होत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. “जनतेचा कौल हा अंतिम” या लोकशाहीच्या तत्वानुसार आज मतपेटीत बंदिस्त झालेले भविष्य उघड होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 50 जागा आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सरासरी 61.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढताना दिसून आला होता. गावागावांतून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.
आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये सुरक्षित असून, आज सकाळपासून चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणीला सुरुवात होताच विजयी उमेदवारांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहेत. प्रत्येक फेरीकडे कार्यकर्ते, समर्थक आणि राजकीय विश्लेषक यांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)
कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
कोकिसरे पंचायत समिती सौ. साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)
हेही वाचा: Karad Election Result : कराड समिती निवडणुकीत धक्कादायक प्रकार; रेनकोटमध्ये मोबाईल नेणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं
सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
राजेश जाधव - (भाजप)
कणकवलीमधील खारेपाटण पंचायत समिती : गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)
सावंतवाडी माडखोल पंचायत समिती : प्रथमेश सावंत (अपक्ष)
शिरवंडे पंचायत समिती : दीपक चव्हाण (शिवसेना)
सावंतवाडी विलवडे पंचायत समिती : प्रशांत सुकी (भाजप)
आंबोली पंचायत समिती : मायकल डिसोझा (शिवसेना)
वेंगुर्ले म्हापण पंचायत समिती : विष्णू फणसेकर (भाजप)
मालवण आचरा पंचायत समिती : दिपक सुर्वे (भाजप)
देवगड मुणगे पंचायत समिती : सदाशिव ओगले (भाजप)
देवगड तळवडे पंचायत समिती : सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)
देवगड पुरळ पंचायत समिती : संजना आळवे (भाजप)
तळवडे पंचायत समिती : सुस्मिता जाधव (शिवसेना शिंदे गट)
मळगाव पंचायत समिती : गौरव मुळीक (भाजप)
परुळे पंचायत समिती : सचिन देसाई (शिवसेना शिंदे गट)
म्हापण पंचायत समिती : यज्ञा साळगावकर (शिवसेना शिंदे गट)
आडेली पंचायत समिती : नितीन मांजरेकर (अपक्ष)
कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार
वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजप)
नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)
हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)
नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)
जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
खारेपाटण जिल्हा परिषद प्राची इस्वालकर (भाजप) (बिनविरोध)
बांदा जिल्हा परिषद प्रमोद कामत (भाजप) (बिनविरोध)
जाणवली जिल्हा परिषद रुहिता तांबे (शिंदे शिवसेना) (बिनविरोध)
पडेल जिल्हा परिषद सुयोगी घाडी (भाजप) (बिनविरोध)
बापर्डे जिल्हा परिषद अवनी तेली (भाजप) (बिनविरोध)
पोंगुर्ले जिल्हा परिषद अनुराधा नारकर (भाजप) (बिनविरोध)
किंजवडे जिल्हा परिषद सावी लोके (भाजप) (बिनविरोध)
कोळपे जिल्हा परिषद प्रमोद रावराणे (भाजप) (बिनविरोध)
उरण नवघर मतदार संघ : प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)
मालवण जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघ : सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)
सावंतवाडी आंबोली जिल्हा परिषद : शोभा गावडे (भाजप)
कोलगाव जिल्हा परिषद : मायकल डिझोजा (भाजपचे बंडखोर उमेदवार)
तळवडे जिल्हा परिषद : संदीप गावडे (भाजप)
वरील यादी निकाल जसे हाती येतील त्याप्रमाणे अद्यावत केली जात आहे.
हेही वाचा: Zilla Parishad Election 2026: सोलापूरमध्ये स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर कारवाई; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल