Sunday, March 08, 2026 12:52:52 PM

Sindhudurg ZP Election Results 2026: सत्ता महायुतीची, चर्चेत बंडखोर! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांचा अनपेक्षित प्रभाव; वाचा विजयी उमेदवारांची यादी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

sindhudurg zp election results 2026 सत्ता महायुतीची चर्चेत बंडखोर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांचा अनपेक्षित प्रभाव वाचा विजयी उमेदवारांची यादी

Sindhudurg ZP Election Results 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत असून जिल्ह्यात महायुती सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, या विजयासोबतच भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर उमेदवारांनी दिलेला धक्का हे या निवडणुकीचं सर्वात चर्चेचं वैशिष्ट्य ठरलं आहे. विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बंडखोर अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागा आधीच बिनविरोध झाल्याने महायुतीचं वर्चस्व निकालाआधीच स्पष्ट झालं होतं. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होताच अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीने एकहाती वर्चस्व राखले असले, तरी सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांनी तब्बल पाच जागांवर विजय मिळवत राजकीय समीकरणं बदलून टाकली.

या निकालांमुळे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंडखोर उमेदवारांच्या विजयामुळे महायुतीला सत्ता मिळाली असली, तरी अंतर्गत नाराजी आणि गटबाजी उघडपणे समोर आली आहे.

दरम्यान, काही माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही माजी अध्यक्षांनी पुन्हा एकदा विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. ग्रामीण भागात स्थानिक नेतृत्व, व्यक्तीगत प्रभाव आणि गटसंबंध यांचा मोठा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदविजयी उमेदवारांची यादी

  • खारेपाटण गट : गुरुप्रसाद दीपक शिंदे (शिवसेना – शिंदे गट)

  • कासार्डे गट:संतोष पारकर (भाजप)

  • कासार्डे गण : सहदेव खाडये (भाजप)

  • आडवली मालडी गट:सोनाली सुनील घाडीगावकर (शिवसेना)

  • म्हापण गट :वंदना किनळेकर (अपक्ष)

  • कोलगाव गट :मायकल डिसोझा (अपक्ष)

  • फोंडाघाट गट :राजन बाळकृष्ण चिके (अपक्ष)

पंचायत समिती विजयी उमेदवार

  • शिरवंडे गण :दीपक ऊर्फ बंडू केशव चव्हाण

  • परुळे पंचायत समिती :सचिन देसाई (शिवसेना :महायुती अधिकृत उमेदवार)

महायुतीचे बिनविरोध विजयी उमेदवार (जिल्हा परिषद)

खारेपाटण :प्राची इस्वालकर (भाजप)
बांदा :प्रमोद कामत (भाजप)
जाणवली :रुहिता तांबे (शिंदे शिवसेना)
पडेल :सुयोगी घाडी (भाजप)
बापर्डे :अवनी तेली (भाजप)
पोंगुर्ले :अनुराधा नारकर (भाजप)
किंजवडे :सावी लोके (भाजप)
कोळपे :प्रमोद रावराणे (भाजप)

महायुतीचे बिनविरोध विजयी उमेदवार (पंचायत समिती)

कणकवली: वरवडे :सोनू सावंत, नांदगाव :हर्षदा वाळके, जाणवली :महेश्वरी चव्हाण, बिडवाडी :संजना राणे, हरकुळ बुद्रुक :दिव्या पेडणेकर, नाटळ :सायली कृपाळ

देवगड: पडेल :अंकुश ठुकरूळ, नाडण :गणेश राणे, बापर्डे :संजना लाड, फणसगाव :समृद्धी चव्हाण, शिरगाव :शितल तावडे, कोटकामते :ऋतुजा खाजनवाडकर

वैभववाडी: कोकिसरे :सौ. साधना नकाशे
वेंगुर्ले: आसोली:संकेत धुरी
मालवण: आडवली मालडी :सीमा परुळेकर
सावंतवाडी: शेर्ले :महेश धुरी
दोडामार्ग: कोलझर :गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या