Monday, November 17, 2025 12:41:48 AM

Smriti Mandhana Wedding News: टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; इंदूरच्या पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार, दिवाळीत ठरला शुभ मुहूर्त

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

smriti mandhana wedding news टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत इंदूरच्या पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार दिवाळीत ठरला शुभ मुहूर्त

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची शान असलेली स्मृती मानधना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्मृती इंदूरमधील सुप्रसिद्ध गायक आणि चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छल सोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. स्वतः पलाशनेच इंदूरमध्ये पत्रकारांशी बोलताना या लग्नाविषयी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, हे लग्न ऐन दिवाळीत संपन्न होणार असून, याच महिन्याच्या अखेरीस लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळण्यासाठी इंदूरमध्ये दाखल झाला आहे. हा सामना उपांत्य फेरीतील पात्रतेसाठी निर्णायक ठरणार आहे. याच दरम्यान पलाश मुच्छल देखील आपल्या आगामी चित्रपट ‘राजू बाजेवाला’ च्या शूटिंगसाठी इंदूरमध्येच आहे. पत्रकारांनी स्मृतीबाबत विचारले असता, तो म्हणाला, “हो, लवकरच स्मृती इंदूरची सून होणार आहे.” त्याचे संपूर्ण कुटुंब भारत-इंग्लंड महिला सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित राहणार असल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा : India vs Australia ODI 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कोहली, रोहित गिलची निराशाजनक कामगिरी

स्मृती मानधना सध्या भारतीय संघाची सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखली जाते. 2025 मध्ये तिने एकदिवसीय सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली असून, सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला आहे. सप्टेंबरमध्ये तिने 77 च्या सरासरीने एकूण 308 धावा, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहेत, अशी उल्लेखनीय कामगिरी केली. तिचा स्ट्राइक रेट तब्बल 135.68 इतका होता.

हा स्मृतीच्या कारकिर्दीतील दुसरा आयसीसी पुरस्कार आहे. यापूर्वी, जून 2024 मध्येही तिने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ किताब पटकावला होता. सप्टेंबर महिन्याच्या पुरस्कारासाठी तिची स्पर्धा पाकिस्तानच्या सिद्रा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ताजमिन ब्रिट्स यांच्याशी होती, पण स्मृतीने प्रभावी खेळीने त्यांनाही मागे टाकले.

पुरस्कार जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना स्मृती म्हणाली, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप विशेष आहे. अशा सन्मानामुळे खेळाडूला आणखी चांगले करण्याची प्रेरणा मिळते.” सध्या ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज मेग लॅनिंगच्या मागोमाग संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.

क्रिकेट मैदानावरील कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यातील नव्या टप्प्यामुळे स्मृती मानधना सध्या देशभर चर्चेत आहे. चाहत्यांसाठी दिवाळीचा हा काळ आता दुग्धशर्करा योग असल्यासारखा आहे कारण त्यांच्या आवडत्या क्रिकेट तारकेच्या लग्नाची आनंदवार्ता चाहत्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर समजली आहे.

हेही वाचा : Maharashtra October Heat Update : 'ऑक्टोबर हीट' सोसेना ! महाराष्ट्रात पारा चढला ; मात्र 'या' भागात पावसाचीही शक्यता


सम्बन्धित सामग्री