Friday, February 13, 2026 05:43:38 AM

Anil Parab UNCUT: मनसे आणि शिवसेनेची युती ते मुंबईतील गटफूटी; अनिल परब चांगलेच संतापले

मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेतील पहिली नगरसेविका डॅा.सरिता म्हस्के यांच्या फुटीसंदर्भात अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

anil parab uncut मनसे आणि शिवसेनेची युती ते मुंबईतील गटफूटी अनिल परब चांगलेच संतापले

आजच्या दिवसात राजकीयवर्तूळातून मोठ्या घडामोडी समोर आल्या ज्यात पहिली घडामोड म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच चर्चत आले आहे. असं असताना दुसरीकडे ठाकरेंच्या गटाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॅा सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या सेना भवनातील बैठकीला डॅा सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Zomato CEO Resigns : स्टार्टअप विश्वात खळबळ! दीपिंदर गोयल यांचा झोमॅटोच्या CEO पदाचा राजीनामा; आता 'ही' व्यक्ती सांभाळणार धुरा
यावेळी अनिल परब म्हणाले की, " आज गट स्थापन केला जातील कोकण भवनला नगरसेवक जायला निघालेत. सरिता म्हस्के संपर्कात आहेत. या सगळ्या प्रोसेस पुढे जाईल तस गोष्टी घडत जातील. त्या लोकांना वेळ दिलाय त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जाईल. युती कारण आघाडी कारण हे निर्णय पक्ष नेतृत्व घेत असत". 
"मनसे हा स्वतंत्र पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत त्यांनी तो निर्णय घेतलाय आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचे नगरसेवक आहेत ते आमच्या संपर्कात येतील आमचं बोलण होईल अजून याला बराच कालावधी आहे. महापौर पदाच्या निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे या दरम्यानच्या मधल्या गडबड गोंधळ हा सगळा जो चाललेला आहे याच्यामध्ये बराच वेळ आहे अजून फायनल कन्क्लूजनला यायला. या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होईल त्यानंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ. मी माझ्या पक्षाचे बोलू शकतो माझ्या पक्षाचा पाठिंबा कोणाला हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील". 

हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ई-केवायसी चुकलेल्या महिलांची आता...
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमाप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे निवडून आलेले नगरसेवक असतात त्यांची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करावी लागते आणि गट स्थापन करावा लागतो. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी विभागीय कार्यालयात केलेली आहे. उपस्थित नसलेल्या नगरसेविका आमच्या संपर्कात आहेत आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे दोन दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल. अनउपस्थित राहण्याचा कारण त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेला आहे. एक महिन्यांचा कालावधी नोंदणीसाठी असतो आणि एक महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही  कधीही नोंदणी करू शकतो. त्यामुळे अजून बरोबर 25 दिवस बाकी आहेत त्यामुळे त्यात आम्ही कधीही नोंदणी करू शकतो त्यामुळे कारवाई करणार का हा जो प्रश्न आहे तो 25 दिवसानंतर लागू होतो. कुठल्या पक्षाला कोणी पाठिंबा द्यायचा याचा निर्णय पक्षाचा नेतृत्व घेत असतं मनसे हा वेगळा पक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आहे त्या पक्षाचा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील. महापौर पदाचा समीकरण उद्या रिझर्वेशन पडू दे रिझर्वेशन पडल्यानंतर महापौर पदाचे उमेदवार येऊ देत उमेदवार आल्यानंतर निवडणुकीची तारीख ठरु देत त्याच्यानंतर आपल्याला सगळं कळवलं जाईल. त्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितले देवाच्या मनात काय आहे ते उद्या सकाळी 11 वाजता कळेल". 

 

https://youtu.be/Vw-BsNc5rSY


सम्बन्धित सामग्री