Sunday, November 16, 2025 05:40:39 PM

Officers Promotion: दिवाळीनिमित्त महसूल अधिकाऱ्यांना खास भेट; 47 अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती

गेल्या 10 वर्षांपासून अडकलेल्या बढत्या अखेर शासनाच्या आजच्या आदेशाद्वारे मंजूर केल्या गेल्या, ज्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना सरकारकडून एक प्रकारची 'दिवाळी भेट'चं मिळाली आहे.

officers promotion दिवाळीनिमित्त  महसूल अधिकाऱ्यांना खास भेट 47 अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती

Officers Promotion: महसूल विभागातील 47 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून अडकलेल्या बढत्या अखेर शासनाच्या आजच्या आदेशाद्वारे मंजूर केल्या गेल्या, ज्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना सरकारकडून एक प्रकारची 'दिवाळी भेट'चं मिळाली आहे.  

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील दालनातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभाग जनतेशी थेट संबंध ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसह काम करणे आवश्यक आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत विभाग अधिक बळकट व्हावा आणि राज्याच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश दिला. 

हेही वाचा - Pune Jain Boarding Case : विक्री थांबवून ‘स्टेटस्को’ जारी; पुणे जैन बोर्डिंग हाऊसप्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा आदेश

शासन आदेशानुसार, अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी (गट-अ) यांना निवडश्रेणीच्या पदावर नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये वेतनश्रेणी एस 25-1 (78,800–2,09,200) पासून एस 27-11 (1,23,100–2,15,900) या श्रेणीपर्यंत वाढ झाली आहे. आदेशात अधिकाऱ्यांना नव्या पदावर 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

हेही वाचा - Diwali Special Train : दिवाळीनिमित्त विशेष सेवा!; पुणे–नांदेडदरम्यान धावणार रेल्वे; मराठवाड्याच्या नागरिकांना दिलासा

महसूलमंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयातून जवळपास 1,600 अधिकाऱ्यांशी संवाद साधत विभागीय कामगिरीबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नोंदणी व भूमी अभिलेख विभागातील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की महसूल विभागाची कामगिरी जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारी असावी. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी मिळून पारदर्शक, कार्यक्षम व जनताभिमुख कार्य करावेत.
 


सम्बन्धित सामग्री