Tuesday, November 18, 2025 02:59:59 AM

Jaykumar Gore On Raj Thackeray: पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात केली; जयकुमार गोरे यांची राज ठाकरे यांची टीका

राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, 1 जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी बंद केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या नावांची नोंद करण्यात आली आहे.

jaykumar gore on raj thackeray पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात केली जयकुमार गोरे यांची राज ठाकरे यांची टीका

Jaykumar Gore On Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण तापले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राज्यातील मतदार यादीत 96 लाख बनावट मतदारांची भर घातल्याचा दावा केला आहे. राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, 1 जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी बंद केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या नावांची नोंद करण्यात आली आहे. ही माहिती मला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर सत्ताधाऱ्यांकडून टीकेचा भडीमार सुरू झाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या आरोपांची जोरदार खिल्ली उडवली. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच मतदार यादी पाहिली, त्यांनी अशा गोष्टी बोलणे हे विनोदीच आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी पुढे म्हटले की, पूर्वी ईव्हीएमला दोष दिला, आता मतदार यादीला दोष देत आहे. पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधण्याचे राजकारण सुरू झाले आहे, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे.

जयकुमार गोरे यांनी राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आक्रमक भूमिकेवर सुद्धा टीका केली. लोकांचा पाठिंबा कमी झाल्याने ही मंडळी अस्वस्थ झाली आहेत. पराभव निश्चित असल्याचे त्यांना जाणवू लागले आहे, त्यामुळेच मतदार यादीवर बोट ठेवले जात आहे, असे गोरे म्हणाले.

हेही वाचा - Balasaheb Thorat on Fake Voter List: राज्यातील मतदारयादीत गोंधळ; राज ठाकरें पाठोपाठ बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा

पूरग्रस्तांसाठी दिवाळीपूर्वी मदतीचा हात

राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. सोलापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना दिवाळी किट आणि भाऊबीज भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा - Raj Thackeray: 'राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले', राज ठाकरेंचा गंभीर आरोप

या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला 18 पदार्थांचा दिवाळी किट, तसेच महिलांना  साडी आणि पुरुषांना पोशाख देण्यात आला. यासोबत मुख्यमंत्र्यांच्या सहीचे विशेष पत्रही प्रत्येक बाधित कुटुंबाला देण्यात आले, ज्यात शासन तुमच्या पाठीशी आहे, दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा संदेश देण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री