Harsha Bhogle Tweet On Feeding Pigeons: सध्या दिल्लीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. अशातचं प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भोगले सामन्यासाठी दिल्लीत पोहोचले असताना त्यांच्या हाती 12 ऑगस्टचे स्थानिक वृत्तपत्र लागले. त्या पेपरमध्ये पुण्यातील एका माजी नगरसेवकांच्या मुलीच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून भोगले भावनिक झाले आणि कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांबाबत त्यांनी जनजागृतीचे आवाहन करत ट्विट केले.
भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'दिल्लीत मैदानावर जाताना मी अनेकांना कबुतरांच्या टोळ्यांना खायला घालताना पाहिले. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. डॉक्टर सतत इशारा देत आहेत की कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार, विशेषतः फुफ्फुसातील फायब्रोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. कृपया कबुतरांना खायला देणं थांबवा.'
हेही वाचा - Cyclothon In Mumbai : NSG तर्फे मुंबईत सायक्लोथॉनचे आयोजन; 26/11 च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाला आदरांजली
या ट्विटच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांच्या मुलीचा मृत्यू पुन्हा चर्चेत आला आहे. मानकर यांची मुलगी शीतल विजय शिंदे ही गेल्या काही वर्षांपासून फुफ्फुसातील फायब्रोसिसने त्रस्त होती. डॉक्टरांच्या मते, शीतल राहत असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर लोक नियमितपणे कबुतरांना धान्य घालत असतं, ज्यामुळे तिथे कबुतरांची घरटी झाली. त्यांच्या विष्ठेमुळे निर्माण झालेल्या संक्रमणामुळेच तिच्या फुफ्फुसांची स्थिती गंभीर झाली.
हेही वाचा - Sachin Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घालवळमुळे भावाचा पाय खोलात, सचिन घायवळवरील A to Z गुन्ह्यांची यादी समोर
शीतलचा दीर्घ आजाराशी लढा अखेर जानेवारीत संपला. तिच्या मागे दोन लहान मुली आणि शोकाकुल कुटुंब आहे. त्यानंतर शाम मानकर यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मुंबई आणि पुण्यात सध्या कबुतरखान्यांवरील वाद वाढत असताना हर्षा भोगले यांचे हे ट्विट अधिक महत्त्वाचे ठरत आहे. अनेकांनी त्यांच्या मताला पाठिंबा देत शहरांतील कबुतरांना अन्न देण्याच्या प्रथेला आळा घालण्याची मागणी केली आहे.