Saturday, June 14, 2025 04:02:57 AM

सुन ले बेटा पाकिस्तान, बाप हैं तेरा हिंदुस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकला सुनावलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानाला सुनावले आहे. मुंबईतील अगस्त क्रांती मैदानापासून ते तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत तिरंगा यात्रा सुरू होती.

सुन ले बेटा पाकिस्तान बाप हैं तेरा हिंदुस्थान मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकला सुनावलं

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानाला सुनावले आहे. मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा निघाली होती. मुंबईतील अगस्त क्रांती मैदानापासून ते तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत तिरंगा यात्रा सुरू होती.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

'माझ्यासोबत म्हणा ''सुनले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान''. आज या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैन्य दलांना आमचे आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे लोक येथे एकत्र आलो आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवून दिले की, 'हमे कोई झुका नहीं सकता. हम न झुकेंगे, न टूटेंगे और न थकेंगे'. अशाप्रकारे, भारतीय सेनेची ताकद काय आहे? ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानाला खडेबोल सुनावले.

पुढे फडणवीस म्हणाले की, 'भारतीय सैन्याने 9 अड्डे पाकिस्तानमध्ये घुसून ते उध्वस्त केले. ज्या ठिकाणी कसाबने प्रशिक्षण घेतले होते, तेही उडवले. पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी झाला नाही. ड्रोन, मिसाईल सर्व नष्ट केले', असे म्हणत मुख्यमंत्री यांनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

'सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठी आणि आपले नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या लष्करांच्या मागे उभे राहिले पाहिजे. परंतु, काही लोक याचं राजकारण करतात. किती मेले? किती गेले? त्यांचा हिशोब मागत आहेत. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी', असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपकडून राज्यभरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी मुंबईमध्ये भाजपची तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री