Friday, May 16, 2025 01:01:06 PM

Swargate Case Update: दत्तात्रय गाडेला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय,पोलिसांच्या तपासातून खुलासा

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, गाडे अनेक वेळा पॉर्न साइट्सवर जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या डेटाच्या आधारे त्याच्या मानसिकतेबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

swargate case update दत्तात्रय गाडेला पॉर्न  व्हिडिओ पाहण्याची सवयपोलिसांच्या तपासातून खुलासा

पुणे: पुणे शहराला हादरवणाऱ्या स्वारगेट अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये झालेल्या अत्याचारानंतर आरोपी दत्तात्रय गाडेविरोधात 893 पानांचं तपशीलवार दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागलेल्या रिपोर्टनुसार, आरोपीला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय होती. पोलिसांनी त्याच्या जीमेल अकाउंटवरून डाटा रिकव्हर करत हे धक्कादायक तपशील उघड केले आहेत.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, गाडे अनेक वेळा पॉर्न साइट्सवर जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या डेटाच्या आधारे त्याच्या मानसिकतेबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिलेल्या अहवालात गाडे हा लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही नमूद करण्यात आले आहे, जे या गुन्ह्याच्या सिद्धतेसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

ही धक्कादायक घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली होती. स्वारगेट बसस्थानकात उभी असलेल्या 26 वर्षीय तरुणीला गाडे याने स्वत:ला कंडक्टर असल्याचे भासवत शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर निर्घृण अत्याचार केला. संपूर्ण राज्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 28 फेब्रुवारीच्या पहाटे आरोपीला त्याच्या गावातून अटक केली होती.

या प्रकरणात पुणे पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला असून, आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आता कोर्टात हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे सशक्त चार्जशीट असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह राज्यातील जनतेकडून होत आहे. 


सम्बन्धित सामग्री