मुंबई: तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती झाल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. यानंतर आता त्या जागेवर तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकतच त्यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती केली आहे. मात्र आता तेजस्वी घोसाळकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भाजपात जाण्याच्या चर्चा खोट्या असल्याचे सांगत तेजस्वी यांनी भाजपात जाण्याच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. तसेच मला कोणत्याही सत्ताधाऱ्याकडून फोन नाही असं म्हणत तेजस्वी यांनी विनोद घोसाळकरांचा दावा खोडला.
हेही वाचा : 'स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार'
तेजस्वी घोसाळकरांची कारकीर्द
तेजस्वी घोसाळकर या दहिसरमधून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राहिल्या आहेत. सासरे विनोद घोसाळकर शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. पती दिवंगत अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेचे संचालक होते. ठाकरे गटात तेजस्वी गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. अभिषेक यांच्या निधनानंतर त्यांनी संचालक पदासाठी प्रयत्न केले आणि आता मुंबै जिल्हा बँकेवर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेवर भाजपचं वर्चस्व असल्याने तेजस्वी यांच्या भाजपप्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.