Monday, June 23, 2025 12:21:48 PM

रेल्वे प्लॅटफॉर्मवर शिक्षकाचे पत्नीशी भांडण; ट्रेनसमोर उडी मारून शिक्षकाने दिला जीव, गोंदिया जिल्ह्यातील घटना

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर शिक्षकाचे पत्नीशी भांडण ट्रेनसमोर उडी मारून शिक्षकाने दिला जीव गोंदिया जिल्ह्यातील घटना
Teacher commits suicide प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

गोंदिया: राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात अनेकदा लोक टोकाचे पाऊल उचलतात. असेच एक उदाहरण रविवारी, 1 जून रोजी संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले, जिथे रागाच्या एका ठिणगीने आनंदी कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी भांडण झाल्यानंतर, एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली. या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला. तुलसीदास पराते, असं मृत व्यक्तीचं नाव असून तो मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रहिवासी आहे. 

विदिशा येथे शिक्षक म्हणून काम करणारे तुलसीदास हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह आमगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील कारंजा गावात आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर, ते रविवारी संध्याकाळी 6 वाजता घरी परतण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह आमगाव स्टेशनवर पोहोचले.

हेही वाचा -बीडमध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढावी लागली, तर 1523 गर्भवतींच्या हातात कोयता; महिला ऊसतोड कामगारांचं धक्कादायक वास्तव उघड 

ट्रेनची वाट पाहताना झाला वाद - 

दरम्यान, घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होते. यावेळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागामुळे दोघांमधील तणाव वाढतच गेला. यामुळे संतापलेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलले आणि अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

हेही वाचा - जामखेडमध्ये लघुशंकेवरून वाद; तिघा अज्ञातांकडून गोळीबार, युवक जखमी

चालत्या ट्रेनसमोर शिक्षकाची आत्महत्या - 

घटनेनंतर पत्नी आणि मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांची गर्दी जमली. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. या घटनेची माहिती मिळताच आमगाव रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. तथापि, घटनास्थळी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री