Saturday, February 14, 2026 01:16:22 PM

Tejasvee Ghosalkar : मुंबईत दोन्ही चिमुकल्यांसह तेजस्वी घोसाळकरांचा रोड शो; अभिषेक घोसाळकरांच्या आठवणीने कार्यकर्ते भावूक

भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचाराच्या सांगता सभेत आणि रोड शोमध्ये आपल्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेतले होते.

tejasvee ghosalkar  मुंबईत दोन्ही चिमुकल्यांसह तेजस्वी घोसाळकरांचा रोड शो अभिषेक घोसाळकरांच्या आठवणीने कार्यकर्ते भावूक

Tejasvee Ghosalkar:  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 2 मधील वातावरणाने आज सर्वांचेच मन हेलावून गेले. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचाराच्या सांगता सभेत आणि रोड शोमध्ये आपल्या दोन्ही लहान मुलांना सोबत घेतले होते. यावेळी दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या स्मृतींनी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले.

प्रचाराचा शेवटचा टप्पा आणि कौटुंबिक ओढ

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, या राजकीय वातावरणात एक भावनिक किनार पाहायला मिळाली. रथावर आपल्या मुलाला कडेवर घेतलेले आणि मुलीला शेजारी उभे केलेले तेजस्वी यांचे रूप पाहून नागरिक हळहळले. फेब्रुवारी 2024 मध्ये पती अभिषेक घोसाळकर यांना संपवण्यात आलं. त्यानंतरचा हा पहिलाच मोठा राजकीय लढा तेजस्वी यांच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा - BMC Election Time Update: मतदानाला लवकर निघा, वेळ कमी आहे; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

ठाकरेंची साथ सोडून भाजपचा झेंडा

तेजस्वी घोसाळकर यांचा राजकीय प्रवास यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या निवडणुकीत त्या प्रभाग 1 मधून शिवसेना (ठाकरे गट) कडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 15 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यंदा त्यांची थेट लढत ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्याशी होत आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis Road Show : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; स्वत: चालवली बुलेट, पाहा व्हिडीओ

घोसाळकर घराण्याची प्रतिष्ठा पणाला

माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असलेल्या तेजस्वी यांच्या पाठीशी या भागात मोठी जनशक्ती असल्याचे चित्र रोड शो दरम्यान दिसले. अभिषेक यांच्या अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी मैदानात आहे, असा संदेश त्यांनी या प्रचारातून दिला आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या