Wednesday, May 21, 2025 01:59:28 PM

अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. यावेळी अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. यामुळे अमरावतीकरांचे स्वप्न साकार झाले आहे. अमरावतीकरांच्या सेवेत पहिलं विमान दाखल झाले आहे. यावेळी अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ डबल इंजिन नव्हे तर आमचं डबल बूस्टर सरकार असल्याचे म्हटले आहे. केंद्रानं अमरावती विमानतळावर पहिलं विमान पाठवल्यानं केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आहेत. अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे त्यांंनी सांगितले आहे. विमानतळामुळे पर्यटनासोबत विकासाला चालना मिळणार आहे. लवकरच अकोला विमातळाचा विस्तार करणार असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

विदर्भाला जेएनपीटी पोर्टशी जोडणार आहे. नदीजोड प्रकल्पामुळे सात जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलेल. अमरावतीत मेडिकल कॉलेजचं काम सुरू केलं असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उडान विमान अंतर्गत विमान घेऊन अमरावती विमानतळावर येण्याची संधी मला मिळाली. डबल इंजिन सरकार असलं म्हणजे काय होतं, आमचे डबल बूस्टर सरकार आहे. त्यामुळे आमचं सरकार  फास्ट चालत आहे. उडान अंतर्गत पहिलं विमान राज्य सरकारला मिळालं असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

हेही वाचा : Rape Case: पाच वर्षीय बालिकेवर नराधमाकडून अत्याचार

'अमरावतीत पायलट प्रशिक्षण होणार' 
अमरावतीत पायलट प्रशिक्षण होणार आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी पालक प्रशिक्षण अमरावतीत सुरू होणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीत तयार होतील. 34 विमान यासाठी राहणार आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी पायलेट ट्रेनिंग प्रशिक्षण अमरावतीत होणार आणि जगात अमरावतीची ओळख होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

'टेक्स्टाईल पार्कमधून दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार' 
देशातील सात टेक्सटाईल पार्कमधील एक पार्क अमरावतीला मिळाला. आपल्या टेक्स्टाईल पार्कमधून 2 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. कापूस उत्पादकांना टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच नदी जोडचा प्रकल्प हाती घेतला. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे आणि पूर्व विदर्भातील दोन जिल्हे या प्रकल्पाला जोडले जाणार आहेत. विदर्भातील कोरडवाहू बाग बागायती करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

'अमरावती विमानतळाचा विस्तार होणार'
पुढच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात विमानतळ सुरू करणार आहे. अमरावतीत मेडिकल कॉलेज सुरू झालं. अमरावतीला आयटी पार्क तयार करण्याचा मानस आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार होणार आहे. धावपट्टी देखील वाढवण्यात येणार आहे. डबल इंजिन सरकार विदर्भाला पुढे नेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

 


सम्बन्धित सामग्री