महाराष्ट्र: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी करतो. याआधी अनेकवेळा MPSC आणि UPSC परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी आंदोलने छेडल्याच देखील पाहायला मिळालं. याच परीक्षेसंदर्भात म्हणजे MPSC आणि UPSC परीक्षेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुयात:
हेही वाचा: एआयमुळे गुन्हेगारीला आळा बसणार
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
त्याचबरोबर एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली. दरम्यान,अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना ह्या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिले होते.
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.