Monday, May 11, 2026 11:44:41 AM

Crime News: संसाराची घडी बसण्यापूर्वीच विस्कटली! पती-पत्नीच्या वादातून 22 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

घरगुती कलहातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका 22 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले आहे.

crime news संसाराची घडी बसण्यापूर्वीच विस्कटली पती-पत्नीच्या वादातून 22 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Crime News: छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव शेणपूंजी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती कलहातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका 22 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले आहे. लग्नाला केवळ सहा महिने उलटलेले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?
पवन ज्ञानेश्वर भुते (वय 22) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवनचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणांवरून वारंवार खटके उडत होते. या सततच्या वादाला कंटाळून पवनने राहत्या घरी गळफास लावून टोकाचे पाऊल उचलले.

असा उघड झाला प्रकार
घटनेच्या वेळी पवन घरामध्ये एकटाच होता. शेजारीच राहणाऱ्या त्याच्या भावाला संशय आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता, पवन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या धक्कादायक प्रकारानंतर तातडीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

हेही वाचा - Ashok Kharat Case: भोंदू खरातचा पाय आणखी खोलात; सहाव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या