Thursday, February 12, 2026 03:07:01 PM

Eknath Shinde On BMC Result : 'मुंबईचा महापौर महायुतीचाच...'; महापालिकेच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

मुंबईकरांनी पोकळ भावनिक आवाहनांना बळी न पडता विकासाच्या राजकारणाला स्वीकारले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

eknath shinde on bmc result  मुंबईचा महापौर महायुतीचाच महापालिकेच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले

Eknath Shinde On BMC Result : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. "मुंबईकरांनी पोकळ भावनिक आवाहनांना बळी न पडता विकासाच्या राजकारणाला स्वीकारले आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. मुंबईसह संपूर्ण राज्यात महायुतीचेच महापौर विराजमान होतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी नमूद केले की, ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (शिंदे गट) विश्वास दाखवला असून, गेल्या निवडणुकीत 67 जागा होत्या, मात्र यावेळी 71 जागा जिंकून शिवसेनेने स्वतःच्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मुंबईतही भाजप आणि शिवसेना महायुती बहुमताच्या आकड्याच्या अत्यंत जवळ पोहोचली असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आणि आमचाच महापौर बसणार, यात कोणतीही शंका नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा - Maharashtra Election Result 2026 : राज्यातील विजयी उमेदवारांची यादी समोर; पहा तुमच्या महापालिकेतील उमेदवाराचं नावं आहे का?

'विकास' हाच खरा ब्रँड 

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांनी ही निवडणूक केवळ भावनेच्या जोरावर लढवण्याचा प्रयत्न केला, पण जनतेने त्यांना नाकारून आमच्या साडेतीन वर्षांच्या विकासकामांना कौल दिला आहे. ज्यांनी विकासाच्या कामात अडथळे आणले, त्यांना मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवून दिली असून आज 'विकास' हाच खरा ब्रँड ठरला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.  

हेही वाचा - CM Fadnavis On BJP Victory : 'आमचं हिंदुत्व संकुचित नाही...'; महापालिका निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अत्याधुनिक शहर बनवणे हेच आमचे ध्येय आहे. जगभरातील सर्वोत्तम सोयीसुविधा मुंबईकरांना मिळाव्यात यासाठी महायुती आता अधिक वेगाने काम करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


सम्बन्धित सामग्री