Mayor Post Conflict : मुंबई महापालिकेच्या निकालांनंतर सत्तेचा पेच सुटण्याऐवजी अधिकच चिघळताना दिसत आहे. मुंबईत 'किंगमेकर'च्या भूमिकेत असलेल्या शिंदेसेनेने अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी आग्रह धरला असतानाच, भाजपने आता थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी भाजपने ठाण्यात शिंदेसेनेची गोची करण्याचा 'गेमप्लान' आखला आहे.
मुंबईत शिंदेंची 'ताज' फिल्डिंग
मुंबईत बहुमतासाठी 114 हा आकडा आवश्यक असताना महायुतीकडे 118 नगरसेवक आहेत. यामध्ये शिंदेसेनेचे 29 नगरसेवक निर्णायक भूमिकेत आहेत. आपला एकही मोहरा फुटू नये यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँड्स एंड' हॉटेलमध्ये ठेवले आहे. भाजपकडे संख्याबळ जास्त असूनही शिंदेंनी अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.
हेही वाचा - Mahapalika elections 2026: मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार! 'या' दिवशी होणार आरक्षण सोडत, राज्याच्या राजकारणाला नवी दिशा
ठाण्यात 'भाई' पॅटर्नला भाजपचे प्रत्युत्तर
मुंबईत अडकलेला घोडा बाहेर काढण्यासाठी भाजपने ठाण्यात 'ठाणेकर' स्टाईलने उत्तर दिले आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेनेने 75 जागा जिंकून वर्चस्व राखले आहे, तर भाजपला 28 जागा मिळाल्या आहेत. शिंदेसेनेकडे स्पष्ट बहुमत असूनही भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यात अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली आहे. "मुंबईत आमचा मोठा पक्ष असताना तुम्ही महापौरपद मागता, मग ठाण्यात आम्ही का नाही?" असाच संदेश भाजपने यातून दिला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Slams BJP: ‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करायला हवं, त्यांना राजकीय इतिहासाची...’; राऊतांची भाजपवर घणाघाती टीका
नाक दाबलं की तोंड उघडतं
राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाण्यात महापौरपदाचा हट्ट धरून भाजपला मुंबईतील मागणी मागे घ्यायला लावायची आहे. ठाण्यात शिंदेसेनेला अडचणीत आणले की मुंबईत ते मवाळ होतील, असा भाजपचा रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देऊन भाजपने 'जैसे थे' परिस्थिती निर्माण केली आहे.