Friday, February 13, 2026 06:33:17 PM

Malad Crime: त्या मालाड स्थानक घटनेतील प्राध्यापकाचे थेट संरक्षणमंत्र्यांशी कनेक्शन; बातमी समजताच...

या घटनेचे गांभीर्य पाहून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश दिले आहेत.

malad crime त्या मालाड स्थानक घटनेतील प्राध्यापकाचे थेट संरक्षणमंत्र्यांशी कनेक्शन बातमी समजताच

Malad Crime: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले. विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक आलोक सिंह यांना ओंकार शिंदे नावाच्या तरुणाने संपवले. या घटनेचे गांभीर्य पाहून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश दिले आहेत.

25 वर्षांचे जुने नाते; राजनाथ सिंह धावून आले मदतीला

मयत आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे गेल्या 25 वर्षांपासून राजनाथ सिंह यांचे अत्यंत विश्वासू सुरक्षारक्षक आहेत. राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून अनिल सिंह सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. आपल्या विश्वासू सहकाऱ्याच्या मुलावर असा प्रसंग ओढवल्याचे समजताच, राजनाथ सिंह यांनी तात्काळ मुंबईतील प्रशासकीय यंत्रणेला फोन करून आरोपीला बेड्या ठोकण्याच्या आणि कुटुंबाला मदत करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा - Pune Crime : महाराष्ट्र हादरला! 50 तोळे सोने अन् 35 लाख देऊनही विवाहितेचा छळ; पुण्यातील सरपंचाच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल

वाढदिवसाच्या दिवशीच पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर

ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे, कारण ज्या दिवशी आलोक यांना संपवण्यात आलं, त्या दिवशी त्यांच्या पत्नीचा (पूजा सिंह) वाढदिवस होता. पूजा सिंह यादेखील ठाकूर महाविद्यालयात शिक्षिका आहेत. रात्री दोघेही वाढदिवसानिमित्त बाहेर जेवायला जाणार होते. मालाड स्थानकात गाडीतून उतरताना आरोपी ओंकार शिंदे याला धक्का लागला, यावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या ओंकारने सोबत असलेला धारदार चिमटा थेट आलोक यांच्या पोटात खुपसला. हा वार थेट किडनीला लागल्याने प्रचंड रक्तस्राव झाला.

रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप 

आलोक सिंह यांच्या काकांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत त्यांनी सांगितले की, "हल्ला झाल्यानंतर आलोक जवळपास पाऊण तास प्लॅटफॉर्मवर मदतीसाठी तडफडत पडून होते. जर रेल्वे पोलिसांनी त्यांना वेळीच रुग्णालयात नेले असते, तर आज आमचा मुलगा जिवंत असता." तथापी, आरोपी ओंकार शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या