ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकुळ घातला आहे. अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि जोरदार पावसाने विळखा घातला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा येलो अलर्ट दिला आहे. त्याचसोबत राज्यातील इतर जिल्ह्यांचा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे.
हेही वाचा- Unseasonal Rain: 'हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला'; राज्यातील 29 जिल्ह्यांत निसर्गाचे तांडव, दोन लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट
कोकणात आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे कमाल तापमान 22.2 तर किमान तापमान 32.8 अंशांवर राहणार असून कोरडे हवामान राहील. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये 32-36 अंशांवर पारा राहील. पुण्यात आज ढगाळ हवामान राहणार असून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार येथे पावसाचा जोर कमी झाला असून नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाच तापमान पुन्हा एकदा वाढू लागला असून यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे.
हेही वाचा- PM Aasha Scheme: भरघोस उत्पादन झालं पण भाव पडला? काळजी नको! सरकार देणार तुमच्या कष्टाचा पूर्ण मोबदला
तसेच मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान 35-39 अंश इतका असून विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कमाल तापमान 34-37 अंश इतके राहणार असून पुढील 24 तास विजांसह पावसाचा अंदाज आहे. यावेळी सोलापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सोलापूर तालुक्यातील टोमॅटोचे पीक उध्वस्त झालं आहे. काढणीला आलेले टोमॅटो मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर तालुक्यातील एक एकर वरील टोमॅटो बाग एक तासाच्या अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली, अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विदर्भात ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम येथे पारा 38 अंशांपार असून अमरावती येथे 39.8 अंश सेल्सिअस तर अकोला येथे 39.1 अंश इतका राहणार आहे. यावेळी आज नागपूरसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.