Thursday, February 12, 2026 06:33:38 PM

Nitesh Rane On BMC Results: 'ठाकरे बंधूंनी आता इस्लामाबादची फ्लाईट पकडावी...'; मुंबईत भाजपच्या विजयावर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

&quotदोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळचे विमान पकडून पाकिस्तानात जावे,&quot अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.

nitesh rane on bmc results ठाकरे बंधूंनी आता इस्लामाबादची फ्लाईट पकडावी मुंबईत भाजपच्या विजयावर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Nitesh Rane On BMC Results: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांना मोठा धक्का दिला आहे. या निकालाचे कल स्पष्ट होताच भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. "दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळचे विमान पकडून पाकिस्तानात जावे," अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.  

नितेश राणेंचा 'इस्लामाबाद'वरून टोला

मुंबईत महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्धव आणि राज ठाकरे यांनी आता इस्लामाबादची फ्लाईट पकडावी आणि तिथे जाऊन 'अल्लाहो अकबर' म्हणत राहावे. मुंबईत आता 'जय श्रीराम' म्हणणारा महापौर बसण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा आहे. माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेंना पाठवा आणि त्यांना माझा 'जय श्रीराम' सांगा, असेही ते खोचकपणे म्हणाले.

हेही वाचा - Pune Municipal Election 2026: पुण्यात महापालिकेवर भाजपचा वर्चस्व? 165 विजयी नगरसेवकांची यादी समोर

दुसरीकडे, ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या यशाचे स्वागत केले. त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 50 पैकी 50 आणि पंचायत समितीच्या 100 पैकी 100 जागा जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विरोधकांचे जिल्ह्याच्या विकासात कोणतेही योगदान नसल्याने त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. तथापी, महामार्ग चौपदरीकरण, विमानतळ आणि आरोग्य क्षेत्रातील कामांच्या जोरावर जनता पुन्हा महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेची आताची आकडेवारी काय?; पहा अजून किती जागांचे अंतिम निकाल येणं बाकी, पक्षनिहाय आकडेवारी समोर

दरम्यान, मुंबईत ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळल्याने राणे समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या 'पाकिस्तान' संबंधी विधानामुळे आता राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, ठाकरे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री