Thursday, May 22, 2025 10:18:43 PM

65 वर्षीय निवृत लिपिकाचे धड आणि मुंडके वेगळे करून प्रेत विहीरीत फेकले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील चिंचाळा येथे जिल्हा सत्र न्यायालयातील एका 65 वर्षीय निवृत्त लिपिकाचा धड आणि मुंडके वेगळे करून मृतदेह विहिरीत फेकल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

65 वर्षीय निवृत लिपिकाचे धड आणि मुंडके वेगळे करून प्रेत विहीरीत फेकले

विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील चिंचाळा येथे जिल्हा सत्र न्यायालयातील एका 65 वर्षीय निवृत्त लिपिकाचा धड आणि मुंडके वेगळे करून मृतदेह विहिरीत फेकल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नामदेव एकनाथ ब्रम्हराक्षस (वय: 65 वर्षे) रा. चिंचाळा (ता. पैठण) (हल्ली मुकाम छत्रपती संभाजीनगर) हे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक म्हणून नोकरीस होते. ते नुकतेच या सेवेतून निवृत्त झाले होते. पैठण तालुक्यातील चिंचाळा येथील शिवरा येथे असलेल्या शेतजमीन गट क्रमांक 121 मध्ये त्यांची 57 गुंठे जमीन होती. मंगळवारी ते आणि त्यांची पत्नी छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या भावाच्या गावी शेतावर घर बांधण्याच्या उद्देशाने आले होते. दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा नक्की करून परत छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा बेत आखला होता. मात्र त्यांचे सर्व स्वप्न 'स्वप्न'च ठरले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर, भाऊ आणि त्यांची पत्नी यांना नामदेव ब्रम्हराक्षस बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांनी नामदेव यांना शोधण्यास सुरुवात केली.

मुंडके नसलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याचे निदर्शनास आले:

यावेळी, नामदेव यांचे मुंडके नसलेले मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसू लागले. हा दृश्य पाहताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचे आवाज ऐकून ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राहाटकर, पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मुंडके नसलेले मृतदेह विहिरीबाहेर काढले.


सम्बन्धित सामग्री