बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी 50 लाख पकडले तर 50 हजार दाखवतात असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेच नाही. पोलिसांनी जर ठरवलं की, मी एक वर्ष हरामीपणा करणार नाही तर सगळ सुतासारख सरळ होईल.पोलिसांनी रेड केल्यावर 50 लाख रुपये पकडले. तर 50 हजार रुपये दाखवतात असा आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हेही वाचा : सुरत आणि अहमदाबादमध्ये घुसखोरांवर कारवाई; दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पोलिसांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधान केल आहेत. सरकारला घरचा आहेर देताना संजय गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात. सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सरळ होईल असेही त्यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्या मुलाला एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली. यावर पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारलं असता ते म्हणाले की माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलीस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली. कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलीस हे आकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.