Sunday, November 16, 2025 11:45:02 PM

Pune Crime : पुण्यात रक्तरंजित थरार! कोयत्याने सपासप वार, 'माया' टोळीने तरुणाला संपवलं; बाजीराव रोडवर भरदिवसा खून

पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रोडवर मंगळवारी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. तीन आरोपींंनी पीडित मयंक खरारे (वय: 17) याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

pune crime  पुण्यात रक्तरंजित थरार कोयत्याने सपासप वार माया टोळीने तरुणाला संपवलं बाजीराव रोडवर भरदिवसा खून

पुणे: पुण्यातील गजबजलेल्या बाजीराव रोडवर मंगळवारी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. तीन आरोपींंनी पीडित मयंक खरारे (वय: 17) याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बाजीराव रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी, 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3:15 वाजल्याच्या सुमारास घडली. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ असलेल्या दखनी मिसळसमोर अचानक जनता वसाहत मधील तीन तरुण आले. दरम्यान, आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते. या तिघा आरोपींनी अल्पवयीन मयंक खरारेच्या डोक्यावर आणि तोंडावर कोयत्याने वार केले. या घटनेत मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर, पोलिसांनी आरोपींना अटक केले असून अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना पूर्व वैमान्यासातूनच घडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Bengluru Crime : क्रूरतेचा कळस ! लिफ्टमध्ये जाताच कुत्र्याच्या एका पिल्लाला आपटून मारलं, दुसरं भेदरलं आणि..., धक्कादायक व्हिडीओ समोर

यापूर्वीही, पुण्यात अशीच एक घटना घडली होती. 1 नोव्हेंबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पीडित गणेश काळे याची हत्या झाली. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघा आरोपींनी गणेश काळेवर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणी, पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली. ही घटना का घडली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.


सम्बन्धित सामग्री