Today's Horoscope 18 MAY 2025: आज रविवार, 18 मे 2025. चंद्र मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे आजचा दिवस निर्णयक्षमता, भावनिक समतोल आणि करिअरबाबत स्पष्टता घेऊन येतो. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास व संवादाचे महत्त्व वाढणार आहे. काही राशींनी संयमाने आणि आत्मपरीक्षणाने दिवस घालवावा लागेल, तर काहींसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडू शकतात.
♈ मेष (Aries): घरगुती वातावरणात थोडा तणाव जाणवू शकतो. वादविवाद टाळा आणि शांत राहा. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल. आज तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा.
♉ वृषभ (Taurus):आत्मविश्वास वाढलेला असेल. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. काही नवीन संधी समोर येऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत खास वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
♊ मिथुन (Gemini) भूतकाळ विसरून नव्या संधींकडे लक्ष द्या. जुन्या सवयी तुमच्या प्रगतीस अडथळा ठरू शकतात. संवादातून नवे नाते जुळू शकते. निर्णय घेताना विचारपूर्वक कृती करा.
♋ कर्क (Cancer): करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे, मात्र संयम राखा. घरात किरकोळ वाद होऊ शकतात, त्यामध्ये समजूतदारपणाने वागा. सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता.
♌सिंह (Leo): तुमचे नेतृत्वगुण आज उठून दिसतील. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा.
♍कन्या (Virgo): दुसऱ्यांचे ऐकून घेणे हे तुमचे बलस्थान ठरेल. सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी गोष्ट पूर्ण होऊ शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
♎तुळ(Libra): सृजनशील विचार आणि भावनिक उबदारपणा यामुळे तुम्ही उठून दिसाल. कुटुंबासोबत वेळ घालवा. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचा कलात्मक स्वभाव आज उजळून निघेल.
♏वृश्चिक (Scorpio): कोणत्याही निर्णयात घाई करू नका. अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. काही गोष्टी उलगडू शकतात ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. संयमाने निर्णय घ्या.
♐धनु (Sagittarius): आज नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळू शकते. लहान प्रवासाचे योग आहेत. ध्येय साध्य करण्यासाठी योग्य दिशा सापडेल. आत्मविश्वास कायम ठेवा.
♑मकर (Capricorn):एखादा छोटासा क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो. कामात शिस्त आणि भावनांत संतुलन राखा. घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करा. आत्मपरीक्षण फायदेशीर ठरेल.
♒कुंभ (Aquarius): नातेसंबंध दृढ करण्यासाठी योग्य वेळ आहे. आपली खरी ओळख समोर आणा. भावना व्यक्त करा. आत्मविश्वासाच्या बळावर सकारात्मक घडामोडी घडू शकतात.
♓मीन (Pisces): तुमचा संवेदनशील स्वभाव आज लोकांच्या मनाला भिडेल. विचारशील आणि कलात्मक दृष्टिकोन प्रभावी ठरेल. प्रेमात यश मिळेल आणि जुन्या अडथळ्यांवर मात करता येईल.