Saturday, June 14, 2025 03:42:40 AM

दोन वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर; रुग्णांना करावा लागतो अडचणीचा सामना

पाचोड (जि. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य रूग्णांना बसला आहे.

दोन वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर रुग्णांना करावा लागतो अडचणीचा सामना

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील पाचोड हे सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने, सरकारने जनकल्याणाची संकल्पना लक्षात घेऊन येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि 10 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर उभारले. येथे चोविस तास रुग्णांवर तातडीने उपचारसेवा मिळणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पाचोड (जि. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे, याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य रूग्णांना बसला आहे.

'जिल्हा सामान्य रुग्णालयात ''अस्थिरोग तज्ञ'' आणि ''स्त्रीरोग तज्ञ'' हे पदे भरलेली असतांनाही पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय 
अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती का देण्यात आली?', असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी, मे महिन्यात, येथे तब्बल चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी डॉ. आसाराम चौरे, डॉ. विक्रम ठाकरे, डॉ. नोमान शेख, डॉ. मसरत शेख आणि डॉ. शिवाजी पवार हे रजेवर आहेत. एवढे मोठे रुग्णालय फक्त दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरोशावर चालत होते.

पाचोड (जिल्हा पैठण) येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील चाळीस ते पन्नासहून अधिक खेड्यापाडे जोडलेली आहेत. यामुळे इथे उपचारांसाठी दरदिवशी 200 ते 250 ओपीडी रुग्ण येत असतात. तर दररोज 1 किंवा 2 महिलांची प्रस्तुती येथे होत असते. परंतु, सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 'स्त्रीरोग तज्ञ' वैद्यकीय अधिकारी डॉ. मसरत शेख आणि 'अस्थिरोग तज्ञ' वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमन शेख या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीपान काळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.मसरत शेख हे 'स्त्री रोग तज्ञ' आहेत.

परंतु, या मागील सहा महिन्यांपासून डॉ.मसरत शेख यांची छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये प्रतिनियुक्तीवर आहे. यामुळे दररोज 100 पेक्षा अधिक महिला रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र, उपचारासाठी येणाऱ्या महिलांना मोठी अडचण निर्माण होत आहे. जिल्हासामान्य रुग्णालयात सर्व वैद्यकीय अधिकारी पदे भरलेली असताना देखील ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रतिनियुक्ती का दिली जात आहे? हे रहस्य अद्यापही उलगडले नाही. मात्र, वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांचा  जिल्हासामान्य रुग्णालयाला सवाल:

'जिल्हासामान्य रुग्णालय हे प्रतिनियुक्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर चालते का?', असाही प्रश्न सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना पडला आहे. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.नोमन शेख आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.आसाराम चौरे हे 'अस्थी रोग तज्ञ' आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 हा पाचोडमधून गेला असून, या ठिकाणी 24 तास वाहनांची वर्दळ असते. त्यात, आठवड्यातून तीनदा अपघात होतात. या परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. याठिकाणी अपघात घडल्यास जखमी रुग्णांना उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येते.

परंतु, "अस्थिरोग तज्ञ" वैद्यकीय अधिकारी डॉ.नोमन शेख यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली असल्याने सर्व रुग्णांचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडत आहे. यामुळे अनेक रुग्णांमध्ये देखील नाराजी पसरत आहे. पाचोड ते छत्रपती संभाजीनगर अंतर जवळपास 60 किलोमीटरचे असल्याने यामध्ये रुग्णांवर तातडीने उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गसह ग्रामीण भागात दैनंदिनी अनेक छोटे-मोठे अपघात घडून येतात. अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार होण्यासाठी दोन "अस्थिरोग तज्ञ" वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यामुळे, 'पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारयांची प्रतिनियुक्तीवरची ड्युटी थांबवावी', अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

मुद्दा पहिला - पाचोडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये परिसरातील दररोज शेकडो गोरगरीब रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. तर महिन्याभरात चाळीसपेक्षा अधिक महिलांची प्रस्तुती या ठिकाणी होत असते. मात्र मागील काही महिनाभरापासून या रुग्णालयात' स्त्री रोग तज्ञ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत,तर "अस्थी रोग तज्ञ" वैद्यकीय अधिकारीही प्रतिनियुक्तीवर आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे. तरी प्रशासनाने त्वरित या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, अन्यथा पाचोडच्या ग्रामिण रुग्णालयाला थेट कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनंजय भुमरे, माजी सरपंच अनिस पटेल,युवराज चावरे यांनी दिला आहे.

मुद्दा दुसरा - शासन गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात येत आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्थी रोग तज्ञ" आणि "स्त्री रोग तज्ञ" हे पदे भरलेली असतानाही पाचोड ग्रामीण रुग्णालयातील डॉ.नोमान शेख, डॉ. मसरत शेख यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्ती का दिली जात आहे? 'वरिष्ठांने तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी', अशी मागणी पाचोडचे खुर्द सरपंच नितीन वाघ, सरपंच दिनकर मापारी, सामजिक कार्यकर्ते कैलास भांड, शहादत सय्यद, आदीने केली आहे.

मुद्दा तिसरा - पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयातील सध्या दोन वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार 
अस्थी रोग तज्ञ डॉ.नोमान शेख आणि स्त्री रोग तज्ञ डॉ.मसरत शेख या हे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. पाचोड हे मोठं बाजारपेठेचे गाव असल्याने रूग्णांची संख्याही जास्त असते. इथे उपचारांसाठी दरदिवशी 200 ते 250 ओपीडी रुग्ण येत असतात. तर दररोज एक किंवा दोन महीलांची प्रस्तुती येथे होत असते. यामुळे, 'या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी' अशी मागणीचे पत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात देण्यात येणारं आहे.

मुद्दा चौथा - याबाबत अधिक माहिती साठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी नेटवर्क रिचेबल असल्याने प्रतिक्रिया भेटू शकली नाही.


सम्बन्धित सामग्री