Wednesday, July 09, 2025 09:14:05 PM

गोंदियातील दोघे सायकलवरून निघाले पंढरपूरला

गोंदिया येथील सायकलीन संडे ग्रुपचे दोन सदस्य सायकलने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. हरी नामाचा गजर करत. विशेष म्हणजे हे सायकल स्वार तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

गोंदियातील दोघे सायकलवरून निघाले पंढरपूरला

गोंदिया: म्हणतात ना..."भक्तीमध्येच शक्ती असते" आणि ही शक्तीच कधी एखाद्याला डोंगर चढवते, तर कधी सायकलवर बसवून पंढरीच्या वारीला घेऊन जाते. गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपचे दोन सदस्य सायकलहून पंढरपूरला निघाले आहेत.  

गोंदिया येथील सायकलीन संडे ग्रुपचे दोन सदस्य सायकलने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. हरी नामाचा गजर करत. विशेष म्हणजे हे सायकल स्वार तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

हेही वाचा : Coronavirus Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 914 वर

गोंदिया येथील सायकलीन संडे ग्रुपचे दोन सदस्य सायकलने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. हरी नामाचा गजर करत ही स्वारी पंढरपूरला निघाली आहे. विशेष म्हणजे हे सायकल स्वार तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करत आहेत. तर यामध्ये एक 68 वर्षीय आहेत. तर दुसरे माजी सैनिक असून त्यांचा एक पाय त्यांनी गमावला आहे. 1999 च्या युद्धात त्यांनी पाय गमावला आहे. त्यांच्या या श्रद्धेचा आणि जिद्दीचा सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. वारीचं वेड बालपणापासूनच होतं. यंदा ठरवलं की चालत नाही, तर सायकलनेच विठुरायाच्या दर्शनाला जायचं. दररोज 90-100 किमीचा प्रवास करून 7 दिवसांत पंढरपूर गाठायचं, असे ठरवलं आहे. गोंदियाचे हे सायकल वारकरी केवळ देवदर्शनासाठीच नाही, तर समाजाला श्रद्धा, चिकाटी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचंही एक उदाहरण देत आहेत.


सम्बन्धित सामग्री