Sunday, February 15, 2026 07:54:09 AM

Ambadas Danve : उदय सामंत यांच्या ऑफरवर अंबादास दानवेंची प्रामाणिक कबुली, म्हणाले...

शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी नुकतचं एक गोंधळात पाडणारं वक्तव्य केलं होत. यावर स्वतः अंबादास दानवे यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्यावर पडखर प्रतिक्रिया दिली आहे.

ambadas danve  उदय सामंत यांच्या ऑफरवर अंबादास दानवेंची प्रामाणिक कबुली म्हणाले

शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी नुकतचं एक गोंधळात पाडणारं वक्तव्य केलं होत. महानगरपालिका निवडुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. असं असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता उदय सामंतांनी केलेल्या वक्तव्यामुळे वर्तवण्यात येत होती. उदय सामंत माध्यमांशी चर्चा करत असताना म्हणाले होते की, "अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासु आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोडेच दिवसात ते आमच्यासोबत असतील." त्यामुळे अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर स्वतः अंबादास दानवे यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्यावर पडखर प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "दानवेंची शिंदेसेनेत जाण्याची प्रोसेस सुरु झाली" अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? शिवसेनेतील बड्या नेत्याचं वक्तव्य
यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, "मी आता त्यांनाच फोन केला होता तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर, त्यांनी सांगितलं की दावस वगैरे विषयावर यांनी टीका केली आहे आणि अंबादास दानवे तुमच्यावर फार टीका करतात त्यावर त्यांनी नॅचरल उत्तर दिलं आहे. त्यांचे वक्तव्य सिरिअसली घेण्याची गरज नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे उद्योजक नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. मी त्यांच्यावर गोष्टी का करतो पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यामुळे त्यांनी असं उत्तर दिल्याची माहिती आहे. त्यांचे जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो"

हेही वाचा- Malad Crime: त्या मालाड स्थानक घटनेतील प्राध्यापकाचे थेट संरक्षणमंत्र्यांशी कनेक्शन; बातमी समजताच...
अंबादास दानवेंना महायुतीकडून कोणती ऑफर आली का? असा प्रस्न करताच अंबादास दानवे म्हणाले की, "चर्चेला आपण काय करू शकत नाही काही लोक म्हणत असतात, असं तसं तसं. मी संघटनेचे काम करणारा शिवसैनिक आहे. मागच्या 30 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे, पक्षाने माझ्यावर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मला लोकसभेपासून ऑफर येत आहेत त्याला काही मतलब आहे का? अर्थ आहे का?" असं म्हणत अंबादास दानवे यांनी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याला पुर्णपणे फटकारलं आहे. 


सम्बन्धित सामग्री