Friday, March 06, 2026 07:36:06 AM

Mumbai BMC elections : राजकीय घडामोडींना वेग! मनसेला दोन महत्त्वाच्या पदांची लॉटरी; राज ठाकरेंची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश

आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

mumbai bmc elections  राजकीय घडामोडींना वेग मनसेला दोन महत्त्वाच्या पदांची लॉटरी राज ठाकरेंची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश

आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. निवडून आलेल्या संख्याबळयानुसार मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे सात प्रभाग समिती अध्यक्ष पद येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून यातील एक किंवा दोन प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्या कोट्यातील तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेने मनसे पक्षासाठी द्यावा, असा आग्रह मनसे पक्षाचा होता मात्र ठाकरेंची शिवसेना तीनही नगरसेवक आपल्या पक्षाचे देणार आहे.

हेही वाचा- Solapur Crime : "हसू झालं गं माझं, जीव होता माझा..." सासरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवलं; पायलच्या तळहातावरील शेवटचे शब्द वाचून डोळे पाणावतील

त्यामुळे आता निवडणूक लढलेल्या आपल्या मित्र पक्ष असलेल्या मनसेला ठाकरेंची शिवसेना प्रभाग समिती अध्यक्षपद देण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. त्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये अंतर वाढत आहे का? असा प्रश्न जेव्हा चर्चिला जात असताना  पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित बैठकांमध्ये चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. अजून बैठकांच्या एक दोन फेऱ्या होतील आणि त्यानंतर आणखीन निर्णय होणार असल्याची माहिती आहे. 
 


सम्बन्धित सामग्री