Thursday, July 17, 2025 02:46:52 AM

'अबू आझमी जे वक्तव्य करतोय ते भाजपच्या इशाऱ्यावर करतोय'; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

अबू आझमींच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांनी भाजपवर गंभीर आरोप केला. हिंदू-मुस्लिम वाद घडवून राजकीय फायदा मिळवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका त्यांनी केली.

अबू आझमी जे वक्तव्य करतोय ते भाजपच्या इशाऱ्यावर करतोय विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar Slams Abu Azmi and BJP: अबू आझमी आणि भाजप हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 'अबू आझमीने एखादं वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि त्यावरून भाजपने हिंदू-मुस्लिम भांडण लावायचं हे ठरलेलं आहे,' अशी जहरी टीका त्यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, 'अबू आझमी जे वक्तव्य करतोय ते भाजपच्या इशाऱ्यावर करतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. कुणाच्या तरी दबावातून तो बोलत असावा. वारकरी संदर्भात झालेलं वक्तव्य मुद्दाम करून पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा फायदा भाजपला होईल यासाठीच हे घडलं.'

हेही वाचा: 'फडणवीस महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पाडत असून...; राऊतांचा भाजपावर घणाघात

अबू आझमी नक्की काय म्हणाले? 

रस्त्यावर होणाऱ्या उत्सवांबद्दल कोणत्याही मुस्लिमाने कधीही तक्रार केलेली नाही. पण जेव्हा मशीद पूर्ण भरते, तेव्हा मशीदीतल्या काही लोक रस्त्यावर 5 ते 10 मिनिटे नमाज पठण करतात. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, 'रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू'. पुण्याहून येताना लोकांनी मला लवकर निघायला सांगितले, अन्यथा पालखीमुळे रस्ता बंद होईल. रस्ता बंद आहे, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही. मात्र रस्त्यावर नमाज केल्यास लगेच तक्रार केली जाते', असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.

या सर्व प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. 


सम्बन्धित सामग्री