Wednesday, April 22, 2026 10:49:08 PM

Water Supply Shutdown : वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील नागरिकांसाठी आठवडाभर पाणीपुरवठा बंद; 'हे' कारण समोर

वसई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे

water supply shutdown  वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील नागरिकांसाठी आठवडाभर पाणीपुरवठा बंद हे कारण समोर

वसई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात  आले आहे.   वसई-विरार शहर महानगरपालिकेला मिळणाऱ्या ‘सुर्या’ पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा 4 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान बंद राहणार आहे. वसई- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवल्या जाणाऱ्या सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आठवडाभर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात  आले आहे.  A/C = वसई विरार शहर महानगरपालिकेस सद्यःस्थितीत 400 द.ल.ली पाण्याची आवश्यकता असून महानगरपालिकेस सुर्या टप्पा 1 व टप्पा 3 योजनेअंतर्गत 200 द.ल.ली. तसेच MMRDA च्या सुर्या 403 द.ल.ली. पाणी पुरवठा योजनेमधून 150 द.ल.ली. असा एकूण 350 द.ल.ली. पाणी पुरवठा होत आहे.

हेही वाचा- Shivsena Operation Tiger : राज्यात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय? ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला
मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पुर्ण करण्याकरीता दि. 04/04/2026 ते 10/04/2026 पर्यंत असे एकूण 7 दिवसाकरीता Shut Down घेण्यात आलेला आहे. सदर कालावधीत MMRDA मार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून वसई विरार शहर महानगरपालिकेस दैनंदिन होणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये 150 द.ल.ली. पाण्याची तूट येणार आहे. सबब शहरास होणारा पाणी पुरवठा हा अपुऱ्या व कमी दाबाने होणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होण्याकरीता महानगरपालिकेमार्फत झोनिंगव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सदर झोनिंगचा तपशिल खालील प्रमाणे.

कशा प्रकारे बंद राहणार खालील प्रमाणे झोन निहाय बंद 

04/04/2026 - विरार पुर्व व पश्चिम

05/04/2026 - नालासोपारा पुर्व व पश्चिम

06/04/2026 - नवघर. वसई

07/04/2026 - विरार पुर्व व पश्चिम

08/04/2026 - नालासोपारा पुर्व व पश्चिम

09/04/2026 - नवघर, वसई

10/04/2026 - विरार पश्चिम व नालासोपारा पश्चिम


सम्बन्धित सामग्री