नागपुर: नागपुरात 12 तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. शहरातील 9 झोनमध्ये 5 तास दक्षिण नागपुरात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
हेही वाचा : Palghar Crime: अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
सोमवारी नागपूरात पाणी बंद असणार आहे.महावितरणकडून नवेगाव खैरी वॉटर पंपिंग स्टेशनला पुरवठा करणाऱ्या 36 केवी फिडरवर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी पाच तास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील 9 झोनमधील जलकुंभाना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्याचा परिणाम रहिवासी वस्त्यांना होणार आहे. तर दुसरीकडे नरेंद्र नगर येथे जुन्या व नव्या फिडरच्या इंटर कनेक्शनसाठी महापालिकेकडून पेंच 4 एक्सप्रेस फीडर 12 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करून वापर करण्याचे आवाहन महापालिका आणि ओसीडब्लूने केलं आहे.