Friday, February 13, 2026 09:05:16 AM

Ameet Satam : 'ठाकरेंचा 25 वर्षांतील तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार उघड करणार...'; अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

अमित साटम यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 11 वर्षांत मुंबईत केलेल्या क्रांतिकारक विकासकामांना दिले आहे.

ameet satam  ठाकरेंचा 25 वर्षांतील तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार उघड करणार अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

Ameet Satam : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारावर जोरदार निशाणा साधला आहे. 'गेल्या 25 वर्षांत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंनी तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मी हा भ्रष्टाचार उघड करणार आहे. ही महापालिका एका परिवाराची जागीर समजली जात होती, पण आता तिथे मुंबईकरांचे राज्य आले आहे,' अशा शब्दांत साटम यांनी उद्धल ठाकरेंवर प्रहार केला.

मुंबईकरांचा विजय आणि विकासाचा मार्ग

अमित साटम यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 11 वर्षांत मुंबईत केलेल्या क्रांतिकारक विकासकामांना दिले आहे. साटम म्हणाले की, 'हा विजय महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा आहे. येणाऱ्या काळात मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे आणि शहराची सुरक्षा अबाधित राखणे ही आमची प्राथमिकता असेल. महायुतीचे नगरसेवक मुंबईकरांची स्वप्ने साकारण्यासाठी वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास काम करतील.'

हेही वाचा - ZP Elections 2026: ग्रामीण भागातील राजकीय समीकरण बदलणार? जिल्हा परिषद निवडणुकांत ‘ओबीसी बहुजन आघाडी’ची एन्ट्री

देशविरोधी शक्तींविरुद्ध लढा सुरूच राहणार

मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करताना साटम यांनी इशारा दिला की, निवडणूक संपली असली तरी आमची लढाई संपलेली नाही. 'मुंबई शहरात देशविघातक, समाजविघातक किंवा आतंकवादी शक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी कोणतीही राजकीय ताकद निर्माण होऊ नये, हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. अशा शक्तींविरुद्ध आमचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'पुण्याचा दादा कोण?' देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला; पहा काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंच्या पराभवावर टिप्पणी

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना साटम म्हणाले की, जे स्वतःच्या मुलाला राहत्या मतदारसंघात निवडून आणू शकले नाहीत, त्यांच्यावर विशेष टिप्पणी करण्याची गरज नाही. भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस सुरू असून अनेक लोक जेलमध्ये आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महायुतीच्या निवडून आलेल्या 90 नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे विशेष बैठक घेणार असून, मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन कार्यपद्धती आखली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 


सम्बन्धित सामग्री