Wednesday, June 25, 2025 01:12:48 AM

नागपूर राडा प्रकरणी काय म्हणाले रामगिरी महाराज?

संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रश्न तापला. काल रात्री नागपुरात महाल परिसरात राडा देखील पाहायला मिळाला. त्यानंतर आता नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे.

नागपूर राडा प्रकरणी काय म्हणाले रामगिरी महाराज

संभाजीनगर: संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रश्न तापला. काल रात्री नागपुरात महाल परिसरात राडा देखील पाहायला मिळाला. त्यानंतर आता नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या. त्यांनतर आता नागपूरच्या राड्या प्रकरणी रामगिरी महाराजांनी प्रतिक्रिया दिलीय. काय म्हणाले रामगिरी महाराज पाहुयात: 

हेही:Nashik: 300 वर्ष जुनी नाशिकची रहाड परंपरा

काय म्हणाले रामगिरी महाराज? 
छत्रपती संभाजी महाराजांची क्रुरपणे हत्या केली. अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरु आहे, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हणालेत. तर नागपूरमध्ये झालेला राडा पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली असं देखील महंत रामगिरी महाराज म्हणाले.

रामगिरी महाराज म्हणाले, औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता. औरंगजेबाने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता. संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी त्याने मारले, अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमच समर्थन आहे.दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे. सध्या अराजकता पसरवली जात आहे याचे कारण मुस्लिम धर्मातील काही धर्म गुरू आहेत. ते लहानपणापासून मुलांना भटकवण्याच काम करतात असेही वक्तव्य महंत रामगिरी महाराजांनी केले आहे. 


सम्बन्धित सामग्री