राज्यभरात 7 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले. या निवडणुकांचे निकाल आज सोमवारी, 9 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमिवर आज सातारा जिल्हा परिषद पंचायत कराड समितीसाठी निवडणुकीची मतमोजणी होत आहे. अशातच ही मतमोजणी होत असताना कराडला पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्याचे ओळखपत्र काढून घेतले आहे. एक कर्मचारी मतमोजणी केंद्रावर मोबाईल रेनकोटमध्ये लपवून नेत होता ज्यामुळे पोलिसांनी या कर्मचाऱ्याला पकडले. त्यानंतर कर्मचारी ओळखपत्र काढून कर्मचाऱ्याला मतमोजणी केंद्राबाहेर काढले.
हेही वाचा- ZP Panchayat Samiti Election Results 2026 : जिल्हा परिषद , पंचायत समितीचा निकाल, जाणून घ्या LIVE UPDATE