Saturday, December 06, 2025 11:36:56 AM

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज किर्तन करणं सोडणार? सोशल मीडियावरील टीकेनंतर घेतला मोठा निर्णय

या सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज मानसिकदृष्ट्या व्यथित झाले असून, एका कीर्तनादरम्यान त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

indurikar maharaj  इंदुरीकर महाराज किर्तन करणं सोडणार सोशल मीडियावरील टीकेनंतर घेतला मोठा निर्णय

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. मात्र, या साखरपुड्याचा थाट पाहून काही लोकांनी महाराजांवर टीका केली. “साधेपणाचे उपदेश करणारे महाराज स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या दिमाखात का करतात?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. या सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज मानसिकदृष्ट्या व्यथित झाले असून, एका कीर्तनादरम्यान त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याच्या कीर्तनात त्यांनी “आता कीर्तन बंद करण्याचा विचार करत आहे” असा भावनिक निर्णय जाहीर केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा -HC Slams State Govt : धक्कादायक! मेळघाटात कुपोषणामुळे 65 बालकांचा मृत्यू; मुंबई उच्च न्यायालयानं काढली राज्य सरकारची खरडपट्टी

काय म्हणाले इंदुरीकर महाराज? 

इंदुरीकर महाराज म्हणाले की, “लोकांना आमच्या कष्टांची कल्पनाच नाही. माझ्या संसाराचा पाया घाम गाळून उभारला आहे. मुलीच्या कपड्यांवरून लोक कमेंट्स करत आहेत. एवढ्या खालच्या पातळीवर कोणी कसं जाऊ शकतं? माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे नवरदेवाच्या घरून आले होते, तरीही लोकांनी तिच्यावर टीका केली. माझ्या कुटुंबावर टीका करणं योग्य आहे का?” असे म्हणत महाराजांनी आपली खंत व्यक्त केली.

हेही वाचा - Rupali Thombare Patil : बहिणीच्या प्रकरणावरून वाद पोलीस ठाण्यात; रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राजकीय प्रवास कठीण वळणावर

ते पुढे म्हणाले की, “31 वर्षं लोकांची सेवा केली, चांगलं बोललो, चांगलं केलं, पण आता मजा राहिली नाही. माझ्याबद्दल काहीही बोला, पण कुटुंबावर बोललेलं सहन करणार नाही. दोन-तीन दिवसात मोठा निर्णय घेणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या तरुणासोबत संगमनेर येथे झाला. साहिल हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक असून, मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहेत. हा साखरपुडा सोहळा राजेशाही थाटात झाला. रथावरून मिरवणूक, वारकरी वेशातील टाळकरी, पारंपरिक वाद्यांचा गजर, आणि पाहुण्यांची गर्दी अशा देखण्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. 
 


सम्बन्धित सामग्री