विधान परिषदेत राज्यपाल नियुक्तीपदी मंत्रिमंडळाची बैठक

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्तीपदी महाविकास आघाडीच्या 12 जागांवर 29 ऑक्टोबर रोजी (आज) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या १२ नावांची यादी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. यात राष्ट्रवादीकडे ३००, काँग्रेसकडे ५० आणि शिवसेनेकडे १५ जणांनी
विधान परिषदेच्या जागेसाठी रांग लावली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार नावं देता येणार आहे.
शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर, सुनील शिंदे, युवा सेनेचे राहुल कनाल, विजय करंजीकर, भाऊसाहेब चौधरी, नितीन बानगुडे पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नावे पुढे येत
आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, उत्तमराव जानकर यांना संधी मिळू शकते. तसेच काँग्रेस पक्षाकडून सचिन सावंत, मोहन जोशी, सत्यजित तांबे, रजनी
पाटील, नसीम खान, मुझफर हुसेन यांची नावं पुढे येऊ शकतात तर पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उर्मिलाचा पराभव झाला होता मात्र तरही विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडी सरकार कडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या नावची शिफारस होऊ शकते.

Exit mobile version