Sat. Aug 13th, 2022

मुंबईत आजही लसीकरण ठप्पच!

मुंबई: मुंबईत कोरोना लसीकरण मोहिम सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणात सातत्याने अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेला कोविशिल्डचे ५० हजार तर कोवॅक्सिनचे ११ हजार २०० असे एकूण ६१ हजार २०० डोस मिळणार आहेत. हा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आज मुंबईत लसीकरण होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक तास थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिकांची कोंडीही झाली आहे. काहींना दुसऱ्या डोसची मुदत संपून लस मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.