Mon. Jan 24th, 2022

राज्यात बुधवारी ६ हजार ८५७ नवे कोरोनाबाधित

राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत भर सुरूच असून बुधवारी ६ हजार ८५७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत,तर ६ हजार १०५ रूग्ण बुधवारी बरे होऊन घरी परतले आहेत.तसेच बुधवारी राज्यात २८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख ६४ हजार ८५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५३ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या ८२ हजार ५४५ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईमध्ये बुधवारी ४०४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८२ जण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पटीचा वेग १ हजार ३८३ दिवसांवर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *