Fri. Jul 30th, 2021

दिलासादायक! मुंबईतील रुग्णदुप्पटीचा कालावधी वाढला!

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना मुंबईकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत गुरुवारी ९६१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी एका दिवसात ८९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

तसेच मुंबईतील रुग्णवाढीचा दर हा ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे,तर रुग्णदुपटीचा कालावधी वाढला असून ५०० दिवसांवर पोहोचला आहे.

गुरुवारी ८९७ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७५ हजाराहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. सध्या एकूण १६ हजार ६१२ उपचाराधीन रुग्ण आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *