Fri. Sep 30th, 2022

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. गुरुवारी मुंबईत ६६६ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे.

गुरुवारी ६६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ७ लाख १९ हजारांपुढे गेली आहे. गुरुवारी दिवसभरात ७४१ रुग्ण बरे झाल्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६ लाख ८६ हजारांवर गेली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचं दिसत आहे. सध्या १४ हजार ८०७ उपचाराधीन रुग्ण आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७३४ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातही रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या केवळ ६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.