लोकल प्रवासासाठी जनतेचे आंदोलन

मुंबई: कोरोना लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी या मुख्य मागणीसाठी मुंबई रेल प्रवासी संघातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर सरकारने निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात केली. मात्र राज्य सरकारने अद्यापही सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा दिलेली नाही. त्यामुळे सीएसएमटी आणि मंत्रालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी’, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे.