Thu. Jun 17th, 2021

राज्यात आणखी ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यात आणखी ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून मुंबईसह विदर्भाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत दादर, शीव परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. आज दिवसभर असाच पाऊस राहिल्यास आजही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी मुंबईला झोडपून काढल्यावर काल पावसाचा जोर कमी झाला होता.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *