Fri. Dec 3rd, 2021

‘हे’ आहे नारायण राणे यांचं निवडणूक चिन्ह

नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढवणार आहे. मात्र त्यांचं निवडणूक चिन्ह काय असेल, याबद्दल उत्सुकता होती. अखेर त्यांना त्यांचं निवडणूक चिन्ह मिळालं आहे.

अखेर निवडणूक चिन्ह मिळालं

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला ‘बादली’ हे निवडणूक चिन्ह मिळालं.

‘बादली’ या चिन्हावर महाराष्ट्रभर निवडणुका लढवून बाजी मारू, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय.

भाजपा-शिवसेना युतीनंतर नारायण राणे यांची कोंडी झाली होती.

यावेळी युतीवर टीका उठवत स्वाभिमान पक्षाची निवडणूक आखाड्यात उतरू, असंही त्यांनी सांगितलं.

 

‘फक्त नवीन चिन्ह मिळायचा अवकाश….’

नारायण राणे अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्यात म्हणाले होते की, ‘मी मुख्यमंत्री झालो,

विविध खात्याचे मंत्री होतो.

लोकांची अहोरात्र कामं केली. कोकणातून सहा वेळा निवडून आलो.

सातव्या वेळी पुन्हा निवडून येणार असे वाटत होतं,पण पराभूत झालो.

केंद्रात ऊर्जामंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर कामं करूनही आम्हांला पराभूत व्हावं लागलं?

नेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे.

तसंच जनतेनं नेत्यांवर विश्वास ठेवायला हवा.

फक्त नवीन चिन्ह मिळायचा अवकाश आहे, यावेळी आम्ही नक्की बाजी मारू.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *