राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज २२वा वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी १० जून १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी फारकत न घेता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो, असं कोणाला पटलं नसतं असं म्हणत, आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

‘ज्यावेळी भाजपची सत्ता आली, त्यानंतरच्या काळात सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला,तो म्हणजे शिवसेना. शिवसेनेने काँग्रेससाठी भूतकाळात विधानसभा निवडणूक लढलेली नाही,काँग्रेसच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली’, असं शरद पवार म्हणाले.

‘कितीही संकटे येवोत,महाराष्ट्र कधीच झुकला नाही, झुकणार नाही’

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे’, अशी टीका केली आहे.

‘जातपात,पंथ यामध्ये भेदभाव न करता राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. आव्हानं येत असतात. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानानं केली. राष्ट्र हा व्यापक विचार ठेवून पक्षाची स्थापना केली. अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. या सगळ्यांमुळेच पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतोय’,असं अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच ‘कितीही संकटे येवोत,महाराष्ट्र कधीच झुकला नाही, झुकणार नाही’, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Exit mobile version