Mon. Sep 27th, 2021

शासकीय कार्यालयात आता नवे नियम लागू

शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत परिपत्रक काढण्यात आलं आहे. शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम या अगोदर जारी करण्यात आले होते. आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत.

शासकीय कार्यालयात मोबाईल वापरण्याच्या संदर्भात काय आहेत नियम?

  • कार्यालयीन कामासाठी कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा
  • मोबाईलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा
  • आपल्या बाजूला इतरही लोक उपस्थित आहेत, याचाही विचार करावा
  • मोबाईलवर बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा
  • मोबाईलवर बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावे
  • अत्यावश्यक वैयक्तिक कॉल्स कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोडवर ठेवण्यात यावा
  • कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर असाल, तर मोबाईल बंद ठेवू नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *