Jaimaharashtra news

मुलांना शाळेत पाठवण्यास ८१.१२ टक्के पालकांची तयारी

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात राज्यातील ८१.१२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे मत नोंदवले आहे. मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असलेल्या पालकांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी पालकांनी के ल्याचे स्पष्ट होत आहे.

काय आहेत निष्कर्ष?

६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग

त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी शाळेत पाठवण्यास होकार

३ लाख ५ हजार २४८ ग्रामीण पालकांचा सहभाग

७१ हजार ९०४ निमशहरी पालकांचा सहभाग

३ लाख १३ हजार ६६८ शहरी पालकांचा सहभाग

सर्वेक्षणात ८१.१८ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार

१ लाख ३० हजार २ पालकांनी मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे मत नोंदवले.

Exit mobile version