Mon. Nov 29th, 2021

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी राज्य सक्षम’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल पवारांना विचारणा केली असता राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात लहान मुलांसाठी कोविड सेंटर्स उभारण्याचं काम सुरु असून पुण्यातील येरवड्यातही लहान मुलांसाठी १०० बे खाटांचं कोरोना सेंटर आजपासून सुरु झालं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पुणे, मुंबई महानगरपालिकांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर यांचा तुटवडा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱी इंजेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यांचा तुटवडा आहे. या इंजेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इंजेक्शन्स केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नसल्याची माहितीही पवारांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *