Jaimaharashtra news

लोणावळ्यात पसरली धुक्याची चादर

लोणावळा : वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत . मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मावळच्या सौंदर्यात भर पडली आहे .

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात देखील आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना लोणावळा आता आकर्षित करू लागला आहे. परंतु कोरोनामुळे मागील एक वर्षापासून पर्यटकांना पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.आणि ही बंदी अद्यापही आहे. मात्र तरी देखील अनेक पर्यटक लोणावळ्यात वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आता गर्दी करू लागले आहेत.

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. या ठिकाणी आता वर्षा विहाराचा आणि या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकदेखील गर्दी करू लागले आहेत.

Exit mobile version