पुणेकरांसाठी खुशखबर! अखेर निर्बंधात सूट

पुणे : पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
पुण्यातील शनिवारी आणि रविवारी असणारी टाळेबंदी रद्द करण्यात आला आहे. दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. दुकाने , हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट ७ टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
पालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. सोमवारपासून सर्व दुकाने सर्व दिवशी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यात काय सुरु काय बंद?
- पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार रात्री १० पर्यंत सुरू राहणार
- पुण्यात मॉल्सही रात्री ८ पर्यंत सुरू, लशीचे २ डोस घेतलेल्यांना प्रवेश
- जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकार सुरु राहतील.
- शनिवार रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
- शहरातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार
- मास्क लावणे बंधनकारक
- ग्रामीण भागात हॉटेल, दुकाने संध्याकाळी ४ पर्यंत सुरु राहणार